अकोला - महापौर खेडकर यांनी घेतला अतिक्रमण विभागाचा आढावा
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। महापौर शारदा खेडकर यांच्या व्दारे त्यांच्या दालनात तसेच मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन महल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण मुक्त शहर या संकल्पने अ
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।

महापौर शारदा खेडकर यांच्या व्दारे त्यांच्या दालनात तसेच मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन महल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण मुक्त शहर या संकल्पने अंतर्गत शहरातील प्रमुख चौक, रस्त्ो हे अतिक्रमण मुक्त करण्यासाठी झोन निहाय अतिक्रमण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत, अतिक्रमण काढल्यानंतर परत त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची विशेष दक्षता घेणे, मनपाव्दारा शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ओपन थिएटरच्या बाजुला आणि उमरी येथील जुनी मनपा शाळा क्रं. दोन ठिकाणी हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणचे सर्व अतिक्रमणे हॉकर्स झोन येथे तातडीने स्थलांतरीत करणे, झोननिहाय अतिक्रमणाबाबत आणि अनधिकृत बांधकामांबाबत आलेल्या सर्व तक्रारी प्राधान्याने मार्गी काढणे, वळण रस्त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, रस्त्यावर बांधकाम साहित्य आढळयास तात्काळ कारवाई करून रस्ते मोकळे ठेवणे, शहरात कनिष्ठ अभियंता यांनी दररोज स्थळ निरीक्षण करून अनाधिकृत बांधकाम आढळल्यास त्यांचेवर नियमानुसार कारवाई करणे, झोन निहाय तयार करण्यात आलेल्या पथकांमध्ये मुबलक प्रमाणात कर्मचारी पुरविणे व त्यांना लागणारे साहित्य खरेदी करणे आदींबाबत सुचना देण्यात आल्या.

यावेळी सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande