
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.) भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि अभ्यासू नेतृत्व असलेले आमदार रणधीर सावरकर यांचा कार्यकुशलतेचा आणि सामान्य माणसाच्या संवेदना जाणून घेण्याचा गुण केंद्रीय नेतृत्वाने दखल घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये सुरू होणाऱ्या एस आर कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सपोर्ट टीममध्ये रणधीर सावरकर यांचा समावेश केला आहे.
अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ता आणि विकासशील नागरिकांचा गौरव करत, भाजपने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ प्रतोद व नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच पक्षाच्या पानद, रस्ते समिती आणि राज्यातील विविध विकास समित्यांमध्ये त्यांचा समावेश असून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखालील समितीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि कार्यकुशलतेला मान्यता देत, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असलेल्या समितीत त्यांची निवड केली आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी ही आनंददायी आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे