अकोला : बांधकाम विभागाविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून ६ मार्चपासून आंदोलनाचा इशारा
अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. Anti Corruption Committee (भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जि. अकोला) यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभ
Photo


अकोला, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. Anti Corruption Committee (भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जि. अकोला) यांच्या वतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात 6 मार्च पासून विभागाविरोधात निषेध आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उगवा फाटा ते आगार तसेच रेल्वे गेट ते अमानतपूर, भोड, हातरुण या रस्त्यांबाबत तसेच काही ठिकाणी नवीन पुलांच्या बांधकामासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप समितीने केला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण व पुलांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.त्याप्रमाणे 12 फेब्रुवारी पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र टेंडर रद्द झाल्याने 20 फेब्रुवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन उकरण्यात आले.या पार्श्वभूमीवर 6 मार्चपासून नाईलाजास्तव उपोषण आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. दरम्यान, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणती भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande