
नागपूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यात माणूसकी आणि नात्याला काळिमा फासणारी घटने उजेडात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सख्या भावाने बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी आणि पिडीता दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी 5 महिन्यांची गर्भवती आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कळमेश्वर येथे एका शाळकरी मुलीच्या पालकांना त्यांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर तिची चौकशी केली, ज्यात मुलीने सख्या भावानेच हा प्रकार केल्याचे कबूल केले. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोक्सो अंतर्गत प्रकरण दाखल केले. पिडीत कुटुंबाची सामाजिक बदनामी टाळण्यासाठी या प्रकरणाची गोपनियता राखली जातेय. तसेच गुप्ततेचा भंग झाल्यास पिडीत कुटुंबाने कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. -----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी