सोलापूरात स्वच्छता पुरस्कार कार्यक्रमाला ठेकेदाराची उपस्थिती
सोलापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पुरस्कार कार्यक्रमाला एका ठेकेदाराच्या उपस्थितीवरून पंढरपूर नगरपालिकेत वादाची ठिगणी पडली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मागील वर्षांमध्ये पंढरपूर
सोलापूरात स्वच्छता पुरस्कार कार्यक्रमाला ठेकेदाराची उपस्थिती


सोलापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पुरस्कार कार्यक्रमाला एका ठेकेदाराच्या उपस्थितीवरून पंढरपूर नगरपालिकेत वादाची ठिगणी पडली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मागील वर्षांमध्ये पंढरपूर नगरपालिकेने स्वच्छतेबाबत चांगले काम केले म्हणून राज्य शासनाने पालिकेला माझी वसुंधरा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये एका ठेकेदाराची मंचावर उपस्थित राहिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नगराध्यक्षांच्या सोबत ठेकेदार कसा असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपालिकेमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत तर भाजपाचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सध्या पालिकेच्या राजकारणामध्ये नगराध्यक्ष विरुद्ध भाजप असे राजकीय द्वंद सुरू आहे. पालिकेच्या उपनगराध्यक्षा सह नगरसेवकांच्या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामावरून नगराध्यक्ष विरुद्ध भाजप असा वाद सुरू असतानाच पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात नगराध्यक्षांसोबत ठेकेदार कसा असा प्रश्न भाजपाच्या काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सभापतींना निमंत्रण देणे आवश्यक होते परंतु नगराध्यक्षांनी कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीतील काही लोकांना कार्यक्रमाला नेले. ही कृती चुकीची असल्याचा आरोप नगरसेवक लक्ष्मण पापरकर यांनी केला आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande