नांदेड-दिल्लीच्या अभिनायकने जिंकली १ लाखांची कुस्ती
नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)भोकर शहराचे ग्रामदैवत असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांस मोठा प्रतिसाद मिळाला. कुस्तीच्या फडासह कबड्डीचे सामने रंगले होते. २ दिवसीय कीर्तन कार्यक्रमास भाविक मोठया संख्
अ


नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)भोकर शहराचे ग्रामदैवत असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांस मोठा प्रतिसाद मिळाला. कुस्तीच्या फडासह कबड्डीचे सामने रंगले होते. २ दिवसीय कीर्तन कार्यक्रमास भाविक मोठया संख्येने हजर होते. कृषी प्रदर्शन व पशुप्रदर्शनासही शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एक लाखांची कुस्ती दिल्लीच्या अभिनायक सिंह याने जिंकली.

भोकर येथील महादेव मंदिर पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेले हेमाड पंथी कोरीव दगडामध्ये आहे. शहराचे ग्रामदैवत म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. अनेक वर्षापासून महाशिवरात्री यात्रेची परंपरा आहे, गत २० वर्षापासून यात्रेचे स्वरूप बदलले आहे. यात्रा मोठी व्हावी यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न केले. पशुप्रदर्शन व कृषी प्रदर्शनाने यात्रेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर तर उद्घाटक तहसीलदार विनोद गुंडमवार, प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रकाशराव देशमुख, रामचंद्र मुसळे उपस्थित होते. पशु प्रदर्शनामध्ये घोडे, गाय, बैल, वासरू गाढव आदी पशुंचा सहभाग होता. कृषी प्रदर्शनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन त्यांनी उत्पादन केलेली पिके चांगल्या प्रकारे सजवली होती. सालासर भजनी मंडळ नांदेड यांचा दणदणीत भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. ह. भ. प.पुरुषोत्तम पाटील व समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन झाले. महादेव मंदिराच्या प्रांगणात कुस्त्यांची दंगल झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande