
नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हदगांव शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी पंजाबराव उर्फ प्रदीप देशमुख, उपाध्यक्षपदी डॉ. देवराव पाटील बाभळीकर आणि कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. तुकाराम बोकारे व सचिवपदी प्रा. किशोर दवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
पंजाबराव देशमुख यांच्या निवासस्थानी राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट हटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व या समितीच्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली. ही संस्था लोकांच्या पाठिंब्यावर चालते आणि कोणत्याही प्रकारचा परकीय निधी किंवा सरकारी अनुदान स्वीकारत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, समविचारी संघटनांशी जोडून घेणे, धर्माची विधायकचिकित्सा, शोषणकारी अंधश्रद्धांना विरोध आणि संत-सुधारकांचा वारसा जपणे या पंचसूत्रीवर ही संस्था चालते. याबाबतीत थोडक्यात माहिती व चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये वृत्तात्र आणि प्रकाशन पंडितराव पतंगे, बुवाबाजी संघर्ष विभाग प्रा. डॉ. भाऊराव नरवाडे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प गजानन कदम, मानसिक आरोग्य विभाग प्रा. नितीन आणभुले, महिला सक्षमीकरण प्रा. डॉ. मुक्ता बिरादार, सांस्कृतिक विभाग प्रा. डॉ. हरीदास बोडखे, समाजमाध्यम प्रसिद्धी गजानन जिद्देवार, विविध उपक्रम विभाग यादव सुकापुरे, कायदा विभाग अॅड. मधुकरराव गोरे, जातीअंत विभाग प्रकाश कांबळे यांचीही नियुक्ती करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis