
छत्रपती संभाजीनगर, 23 फेब्रुवारी (हिं.स.) छत्रपती संभाजी नगर येथील
बाजारात टरबुजांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील फळ बाजारात मोठी उलाढाल सुरू असून विविध फळांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या द्राक्षे २०० रुपये, सफरचंद २५० रुपये तर संत्री ३०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. याशिवाय केळी ६० ते ८० रुपये डझन, डाळिंब १८० ते २२० रुपये किलो, पपई ५० ते ७० रुपये किलो, कलिंगड ३० ते ४० रुपये
किलो, खरबूज ६० ते ८० रुपये किलो, चिकू ८० ते १०० रुपये किलो, मोसंबी १२० ते १५० रुपये किलो, अननस ८० ते १०० रुपये नग, तसेच स्ट्रॉबेरी २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
इफ्तारसाठी फळांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने घाऊक व किरकोळ बाजारात आवक वाढली आहे. विशेषतः रसाळ आणि ताज्या फळांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
'रमजानमुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इफ्तारसाठी ग्राहक विविध प्रकारची फळे खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात आवकही वाढवण्यात आली आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.'
रमजाननिमित्त बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून फळ विक्रेत्यांनाही दिलासा मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis