सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाचे दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड बुधवारी बाजारात
शाश्वत विकासाची कामे होणार : महापौर नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दोनशे कोटीचे ग्रीन बॉण्ड बुधवारी (दि.25) बाजारात येणार आहेत. दरम्यान या रकमेतून सिंहस्थ कामांचा शाश्वत विकास केला जाणार आहे. सदर ग
सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाचे दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड बुधवारी बाजारात


शाश्वत विकासाची कामे होणार : महापौर

नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दोनशे कोटीचे ग्रीन बॉण्ड बुधवारी (दि.25) बाजारात येणार आहेत. दरम्यान या रकमेतून सिंहस्थ कामांचा शाश्वत विकास केला जाणार आहे. सदर ग्रीन बॉण्डची खरेदीसाठी नाशिकच्या उद्योजक, व्यावसायिकांसह नागरिकांनी त्यांच्या क्षमतेनुसार बॉण्डची खरेदी करुन सिंहस्थासाठी हातभार लावावा, असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केले.

नाशिक महापालिकेच्या (हरीत रोखे) ग्रीन बॉण्डचे बुधवारी लिस्टींग केले जाणार असून त्यासंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता महापौर आडके बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, मुख्य लेखा वित्त आयोगाचे दत्तात्रय पाथरुट आदीसह उपस्थित होते. ग्रीन बॉण्ड खरेदीसाठी बुधवारी खुले होऊन 2 मार्च ला बंद होणार आहे. महापौर आडके म्हणाल्या, काळानुसार गुंतवणीकीचे वेगवेगळे पर्याय घ्यायला हवेत. त्यानुसार सिंहस्थ पूर्व कामे आहेत. ती माग लावायची असल्याने याकरिता सदर ग्रीन बॉण्ड रकमेचा उपयोग होणार आहे. शहर विकासात दिवसेंदिवस पुढे जात आहे. त्यामुळे सिंहस्थात होणारी विकास कामे शाश्वत केली जातील. पुढच्या वषचाच नव्हेतर 2029 मध्ये होणाऱ्या सिंहस्थात कामातही ग्रीन बॉण्ड रकमेचा उपयोग केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. आयुक्त मनीषा खत्री यांनी ग्रीन बॉण्डची प्रक्रिया कशी असेल आणि त्यातुन कोणती कामे केली जातील. याबाबतची माहिती दिली. तसेच प्रेझेंटेशनद्वारे सिंहस्थात केल्या जाणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली. उपमहापौर विलास शिंदे यांनी मनपाच्या वतीने केल्या जाणाऱ्या ग्रीन बॉण्डद्वारे सिहस्थासाठी निधी उभारला जात असल्याचे म्हटले.

दहा हजारांची मर्यादी

ग्रीन बॉण्ड खरेदीकरिता दहा हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात सहामाहीसाठी 8.05 टक्के तर वर्षभरासाठी 8.20 व्याज दिले जाणार आहे.

गुंतवणुकीचा कालावधी

3 वर्षे 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे, 7 वर्षे, 8 वर्षे, 9 वर्षे आणि 10 वर्षे यात सहामाही कूपन (व्याज) देयकाचे पर्याय उपलब्ध आहेत.ट्रेडिंग केवळ डीमॅट स्वरूपातच असून 2 मार्च रोजी ते बंद होइल.प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वाटप केले जाइल. केअर ॲनालिटिक्स अँड ॲडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेडने 14 जानेवारी 2026 रोजी ग्रीन बॉन्ड फ्रेमवर्कवर अहवाल प्रसिद्ध केला गेला. हे बिगर-परिवर्तनीय कर्ज रोखे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडवर सूचीबद्ध करणे प्रस्तावित आहे.

खालील कामे रोख्याच्या किंमतीतुन होणार

नाशिक महापालिका सिंहस्थ कुंभमेळा आणि पायाभूत सुविधांसाठी, विशेषतः मुकणे धरण थेट पाइपलाइन योजनेसाठी, सेबीकडून मंजुरी मिळालेले 200 कोटी रुपयांचे हरित रोखे बाजारात येणार आहेत. पिंपरी-चिंचवडच्या धतवर ही योजना राबवली जात असून, यातून पर्यावरणपूरक विकासासाठी निधी उभारला जाईल. नाशिक हरित रोखे बाजाारातील मुख्य उद्देश सिंहस्थातील विकास कामे, सांडपाणी व्यवस्थापन, आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande