
लातूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने कळविण्यात आले आहे की, हवामान विभागाने जिल्ह्यात काही भागांत हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविला आहे.
आज तसेच उद्या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतात काम करताना विजेपासून संरक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. उघड्यावर उभे राहणे, झाडाखाली थांबणे किंवा विद्युत खांबाजवळ जाणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
प्रशासनामार्फत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis