छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम फिजिओथेरपी विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा
छत्रपती संभाजीनगर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)रुग्णांची मानसिकता समजून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि त्यांचे मनोधैर्य उंचावणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. केवळ वैद्यकीय उपचार देणे पुरेसे नसून समुपदेशकाच्या भूमिकेतूनही आपण कार्यरत असता. डॉक्टर म्हणू
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमजीएम फिजिओथेरपी विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा


छत्रपती संभाजीनगर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)रुग्णांची मानसिकता समजून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि त्यांचे मनोधैर्य उंचावणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे. केवळ वैद्यकीय उपचार देणे पुरेसे नसून समुपदेशकाच्या भूमिकेतूनही आपण कार्यरत असता. डॉक्टर म्हणून आपली सेवा बजावत असताना रुग्णांप्रती दयाळूपणा आणि संवेदनशीलता जपत कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीचा पाचवा पदवी वितरण समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाला. यावेळी, अपर जिल्हाधिकारी धानोरकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या पदवी वितरण सोहळ्यास महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रविण सूर्यवंशी,वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. एच. आर. राघवन, डॉ. प्रेरणा दळवी, मुख्य वित्त अधिकारी भारत पेंटावार, प्राचार्य डॉ. सरथ बाबू, उपस्थित होते.

धानोरकर म्हणाल्या की, रुग्णांशी संवाद साधताना त्यांच्या वेदना, भावना आणि अपेक्षा समजून घेणे महत्त्वाचे असून आपण केवळ उपचार करत नाही तर रुग्णांचे आयुष्य सुधारत असता. या सोहळ्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या एकूण ६६ विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. यामध्ये मास्टर ऑफ फिजिओथेरपीच्या १८ आणि बॅचलरच्या ४८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रास्ताविक डॉ. वैभव कापरे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande