
नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव व भव्य खंजेरी भजन स्पर्धा उनकेश्वर येथे पार पडली या स्पर्धेत अमरावती जिल्हयातील निमगव्हाण येथील आदर्श भजन मंडळ यांनी पहिले बक्षीस पटकावले आहे.
अध्यात्म ज्ञान योग साधना सेवाश्रमाच्या विद्यमाने सर्व संत स्मृतीदिन महोत्सव व भव्य खंजेरी स्पर्धेचे उद्घाटन उनकेश्वरचे सरपंच पुंडलिक गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अनंतराव काटकोजवार घाटंजी तर प्रमुख पाहुणे सेवाश्रमाचे अध्यक्ष बाबाराव केशवे, उपाध्यक्ष किशन पवार, झानेश्वर जाधव, पुंडलिक घोडाम, शिवराम मालेवार पाटील, प्रेमसिंग राठोड उपस्थित होते. काटकोजवार म्हणाले की, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी मानवाच्या कल्याणासाठी देह झिझविला त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी भजन संगीताच्या माध्यमातून देश विदेशात जनजागृती केली. तेव्हा भजनस्पर्धेमुळे राष्ट्रसंताचे विचाराचे प्रचार, प्रसार होतो.
यात श्रीगुरुदेव भजन मंडळ मोहपुर ता. माहूर जि. नांदेड, स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ मोझरी जि. अमरावती (तिसरे बक्षीस), सुपुनाथन भजन मंडळ घाटंजी जि. यवतमाळ, श्री गुरु हिरासुका भजन मंडळ माहूरगड जि. नांदेड (पाचवे बक्षीस), अखिल भारतीय श्री गुरुदेव भजन सेवा मंडळ घाटंजी (चौथे बक्षीस), श्री गुरुदेव बाल भजन मंडळ रा. करंजी सेलू ता. माहूर जि. नांदेड, हनुमान भजन मंडळ कारेगाव बंडल ता. केळापूर जि. यवतमाळ, आदर्श भजन मंडळ निमगव्हाण जि. अमरावती (पहिले बक्षीस), श्री गुरुदेव सेवा मंडळ रा. कनकी ता. किनवट जि.नांदेड, सार्थक भजन मंडळ रा. हस्तापूर ता. बाभुळगाव जि. यवतमाळ (दुसरे बक्षीस. असे बक्षीस पटकाविण्यात आले. या भजन स्पर्धेला १० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून उमेश ताटेवार, प्रशांत खाडे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis