सहा वर्षात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे निकामी - नाशिक मनपा आयुक्त
नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने महाआयटी संस्थेच्या माध्यमातून शहरभर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे ८० कोटींच्या निधीतून बसविण्यात आले. आता सहा वर्षानंतर हे सर्व कॅमेरे खराब झाल्याची माहित
सहा वर्षात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे निकामी - नाशिक मनपा आयुक्त


नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।

शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने महाआयटी संस्थेच्या माध्यमातून शहरभर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे ८० कोटींच्या निधीतून बसविण्यात आले. आता सहा वर्षानंतर हे सर्व कॅमेरे खराब झाल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती देताना सांगितले की, स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे आयुक्त खत्री यांनी लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शहराची सुरक्षा राखण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्प २०१९ साली स्मार्ट सिटीने राबवला. परंतू सहा वर्षांनंतरही हा प्रकल्प अपूर्ण राहिला. तो सुरु करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्याचे आयुक्तांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी बीएसएनएल कंपनीकडून ऑप्टीकल फायबर सुविधा भाड्याने घेण्यात आली. मात्र सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी अडचणी आल्याचे आयुक्तांनी सांगितले.आता या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारदेशीर कारवाई करण्याबाबतचा अहवाल महाआयटी संस्थेकडे पाठविण्यात येईल. त्याचबरोबर येणार्या सिंहस्थात शहराची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेर बरविण्यात येणार असल्याचेही आयुक्त मनीषा खत्री यावेळी म्हणाल्या.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन वर्षांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना उभारण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मोठी मदत होणार आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत अहिल्याबाई होळकर पूल ते आनंदवली सोमेश्वर पर्यंत बोटिंग ने प्रवास करण्याच्या बाबत बोटी घेण्यात आल्या होत्या या सर्व बोटी आज धुळखात पुढून आहे त्याची चौकशी केली जाईल याबाबत अधिक माहिती नंतर दिली जाईल असे सांगून त्यांनी एकूण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाबाबत अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त करून चुकीच्या प्रकरणांच्या चौकशीचे संकेत देखील दिले आहेत.---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande