खतगावकर स्मृती क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे बंधू तथा गोदावरी मनावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ शंकरनगर ता. बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या वतीने एमपीएल च
खतगावकर स्मृती क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण


नांदेड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे बंधू तथा गोदावरी मनावर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव स्व. मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ शंकरनगर ता. बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलच्या वतीने एमपीएल चषक क्रिकेट स्पर्धा येथील गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर पार पडल्या.

या स्पर्धेतील विजेत्या संघास पब्लिक स्कूल येथे क्रिकेट विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. पी. पांडेय तर प्रमुख पाहुणे म्हणून रामतीर्थचे संतोष पाटील पुय्यड, शेषेराव कंधारे, संजय दोमाटे उपस्थित होते. कार्यक्रमात या एमपीएल क्रिकेट सामन्यातील विजेत्या संघास प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, कंधारे, डोमाटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक टायगर संघाने पटकावला असून संघाचे कर्णधार संतोष पाटील पुय्यड व त्यांच्या टीमला २१ हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सह्याद्री संघाने मिळवला. संघाचे कर्णधार

ब्रम्हानंद कांबळे व टीमला ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले तर तृतीय क्रमांक स्वराज संघाने पटकावला असून कर्णधार आसिफ शेख व त्यांच्या संघाला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महेश गवळी, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर म्हणून अभिजीत कांबळे तर सामनावीर म्हणून राम लोहबंदे यांना प्रत्येकी १५०० रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वर्गीय मधुकर एमपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी २१हजार रुपये रोख हे प्रथम पारितोषिक प्राचार्य डी. पी. पांडेय व प्राचार्य धनंजय शेळके, प्राचार्य शिवाजीराव पाटोदे, मुख्याध्यापक धोंडीबा वडजे यांच्या वतीन तर द्वितीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते माधव वाघमारे यांच्या वतीने व तृतीय पारितोषिक तिरुपती किराणा शंकरनगर यांच्या वतीने देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande