संघर्ष धान्य बँकेचे राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार जाहीर
बीड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। गेवराई तालुक्यासह जिल्हाभरातील रंजल्या गांजल्या दिन, दलित दुबळ्या लोकांची सेवा करून गरजवंतासाठी एक घास हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे राबविणाऱ्या संघर्ष घान्य बँकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम क
संघर्ष धान्य बँकेचे राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार जाहीर


बीड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)।

गेवराई तालुक्यासह जिल्हाभरातील रंजल्या गांजल्या दिन, दलित दुबळ्या लोकांची सेवा करून गरजवंतासाठी एक घास हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे राबविणाऱ्या संघर्ष घान्य बँकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यातींना राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सालाबादाप्रमाणे याहीवर्षी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

संघर्ष सामाजिक धान्य बँकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना

राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. संघर्ष धान्य बँक गेल्या दहा वर्षांपासून गरजवंतांसाठी एक घास हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे राबवत आहे. आजपर्यंत अनेक गरजवंतांना घरपोच घास उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष घान्य बँक ही कायम तत्पर असते. या संघर्ष धान्य बँकेची धुरा ही बहुतांशी जिल्हाभरातीलज शिक्षक वर्ग व व्यापारी वर्गाने खांद्यावर घेतली असल्याने संघर्ष बँकेचे काम हे

दुरदुरपर्यंत पाहोचलेले आहे. तसेच धान्य बँकेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात असून यावेळेस सेवारत्न पुरस्कार माधवराव पवार ज्ञानमंदिर सेवा प्रकल्प, धनंजय सुलाखे आदर्श शिक्षक, नामदेव चौधार आदर्श शिक्षक, भारत चव्हाण आदर्श शिक्षक, विकास घोडके आदर्श शिक्षक, योगेश म. गायके किर्तनकार, आप्पासाहेब महानोर पत्रकार, समाजसेवक, शीतलताई साखरे आदर्श सरपंच,

धोंडराई, ज्ञानेश्वर पिंगळे, समाजसेवक, लातूर पॅटर्न क्लासेस, गेवराई, आदर्श शैक्षणिक संस्था, गेवराई तालुका व्यापारी महासंघ सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था यांना जाहीर झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande