सोलापूर : विधान परिषदेसाठी शशिकांत चव्हाणच्या नावाची चर्चा
सोलापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार कमबॅक केल्यामुळे जिल्ह्यात भाजप ताकदवान झाला. अशा परिस्थितीत विधान परिषदेला भाजपचा चेहरा कोण? नवा की जुना असणार याविषयी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. यात भाजप ग
सोलापूर : विधान परिषदेसाठी शशिकांत चव्हाणच्या नावाची चर्चा


सोलापूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार कमबॅक केल्यामुळे जिल्ह्यात भाजप ताकदवान झाला. अशा परिस्थितीत विधान परिषदेला भाजपचा चेहरा कोण? नवा की जुना असणार याविषयी जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. यात भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या रूपाने आणखीन एका नव्या नावाची भर पडली.

सोलापूरच्या विधान परिषदेच्या जागेची मुदत २०२२ ला संपली. राज्यामध्ये त्यावेळी ज्या जागेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सोलापूरच्या जागेसाठी पुरेसे मतदार नसल्याच्या कारणावरून निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्याला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. मात्र, नुकत्याच नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यामुळे विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी आवश्यक असणारे मतदार उपलब्ध झाले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातून अनेकांची नावे चर्चेत येऊ लागली.

त्यामध्ये राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, दिलीप माने, राजन पाटील, अशा अनेक दिग्गज नावे सध्या चर्चेत येत असताना भाजप ग्रामीणचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नावाची देखील यामध्ये भर पडली. शशिकांत चव्हाण यांचा प्रवास हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष असा झाला. पक्ष बांधणीमध्ये बूथ प्रमुख, गटप्रमुख, पन्ना प्रमुख अशा अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे ज्या पद्धतीने पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडताना धक्कादायक निर्णय घेत चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande