गुरु तेग बहादूर यांचा 350 व्या शहीदी समागम कार्यक्रम : नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडून पुर्वतयारीचा आढावा
नंदुरबार, 23 फेब्रुवारी (हिं.स.) ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नव
जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी


नंदुरबार, 23 फेब्रुवारी (हिं.स.) ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली

इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई येथील समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आढावा घेतला.

या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अक्षययेवले, नगरपालिका प्रशासन विभागाचे संगणक अभियंता सुशिलकुमार बोदडे, जिल्हापरिषद ग्रामपंचायत

विभागाचे विस्तार अधिकारी एस.व्ही. दशपुते, बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, जिल्हास्तरीय

अशासकीय सदस्य भावेशकुमार पवार, जिल्हास्तरीय जागरण, प्रचार व प्रसार

समितीचे सर्व सदस्य आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या तयारी माहिती निवासी

उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी यावेळी देतांना सांगितले की, जिल्ह्यातून 1 हजार 800 भाविक या

कार्यक्रमासाठी जाणार असून तसे त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रचार रथ, प्रवास

वाहने, तालुकास्तरावर होर्डिंग्ज, शाळा, महाविद्यालयात श्री गुरु तेग बहादूर साहिब जी गीत व डॉक्युमेंन्ट्री

दाखवणे, प्रभातफेऱ्या काढणे, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दैनंदिन झालेल्या प्रत्येक

कार्यक्रमाचे छायाचित्रे, व्हीडीओ संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात डिजीटल प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली

सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची नांव, पत्ता, संपर्क क्रमांक याबाबतच्या याद्या

प्रशासनास त्वरीत उपलब्ध करुन द्याव्यात जेणेकरुन पुढील नियोजन करणे सोपे होईल, असेही जिल्हाधिकारी

श्रीमती सेठी यांनी यावेळी जिल्हास्तरीय जागरण, प्रचार व प्रसार समितीच्या सदस्यांना सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande