परळीच्या रामरक्षा गोशाळेला शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार
बीड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ''महाराष्ट्र राज्य देशी गोवंश सन्मान'' योजनेंतर्गत रामरक्षा प्रतिष्ठान संचलित रामरक्षा गोशाळेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौ
परळीच्या रामरक्षा गोशाळेला शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार


बीड, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य देशी गोवंश सन्मान' योजनेंतर्गत रामरक्षा प्रतिष्ठान संचलित रामरक्षा गोशाळेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

परळी वैजनाथ येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशी गोवंश संवर्धन, गोसेवा आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास पशुसंवर्धन विभाग सचिव डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीण कुमार देवरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सुनील सूर्यवंशी, उद्धव नेरकर, सनतकुमार गुप्ता आणि नितीन मार्कडेयउपस्थित होते. रामरक्षा गोशाळेचे संचालक रतन कोठारी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरीय पातळीवर या कार्याची दखल घेत सन्मान केल्याने परळीकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रामरक्षा गोशाळेला मिळालेला हा पुरस्कार परळी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, सर्व स्तरांतून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोसंवर्धन आणि शाश्वत शेतीपूरक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande