आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह झाले बंद
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने दमदार कामगिरी करत मजबुतीसह बंद झाला. सकाळी व्यवहार सुरू होताच खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी पहिल्या 15 मिनिटांतच जोरदार उस
Stock Market Closing


नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराने दमदार कामगिरी करत मजबुतीसह बंद झाला. सकाळी व्यवहार सुरू होताच खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी पहिल्या 15 मिनिटांतच जोरदार उसळी घेतली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स 0.58 टक्क्यांनी वधारून 83,294.66 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 25,713 अंकांवर स्थिरावला.

सकाळी सेन्सेक्स 82,906.83 अंकांवर उघडला आणि काही वेळातच 83,486.15 अंकांपर्यंत झेपावला. मात्र त्यानंतर नफा वसुलीमुळे निर्देशांकात चढ-उतार दिसून आले. दुपारनंतर पुन्हा खरेदी वाढल्याने बाजाराने सावरत मजबूत बंद दिला. निफ्टीनेही 25,678.40 अंकांवर सुरुवात करून 25,771.45 अंकांचा उच्चांक गाठला होता. मध्यान्ही घसरण झाल्यानंतर शेवटी तो वाढीसह बंद झाला.

आजच्या व्यवहारात पीएसयू बँक, फार्मास्युटिकल आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील शेअर्समध्ये सातत्याने खरेदी झाली. ऑईल अँड गॅस, एफएमसीजी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रानेही सकारात्मक कामगिरी केली. मात्र आयटी, टेक्नॉलॉजी, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. व्यापक बाजारात मिश्र चित्र होते. मिडकॅप निर्देशांक घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने वाढ नोंदवली.

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.96 लाख कोटी रुपयांची भर पडली. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 469.07 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दिवसभरात हजारो शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार झाले असून वाढणाऱ्या शेअर्सची संख्या लक्षणीय होती. एकूणच आठवड्याची सुरुवात सकारात्मक वातावरणात झाली असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले.

दिवसभर झालेल्या खरेदी-विक्रीनंतर, शेअर बाजारातील मोठ्या समभागांमध्ये, अदानी पोर्ट्स आजच्या टॉप ५ गेनरच्या यादीत २.९३ टक्के, कोटक महिंद्रा २.२२ टक्के, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज २.११ टक्के, एचडीएफसी लाईफ १.८९ टक्के आणि नेस्ले १.६५ टक्के वाढीसह सामील झाले. दुसरीकडे, हिंडाल्को इंडस्ट्रीज २.०८ टक्के, इन्फोसिस १.९० टक्के, विप्रो १.८९ टक्के, टेक महिंद्रा १.१० टक्के आणि सिप्ला १.०९ टक्के घसरले आणि आज टॉप ५ गेनरमध्ये घसरले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande