
लातूर, 23 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे व दुपारी अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा यांसारखी रब्बी पिके तसेच आंबा, द्राक्षे व चिंच या फळबागांनाही मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. या अनपेक्षित संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य व भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis