रत्नागिरी : उपनगराध्यक्षांना शिवीगाळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी नगरसेवकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणावर तत्
रत्नागिरी : उपनगराध्यक्षांना शिवीगाळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रत्नागिरी, 23 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी नगरसेवकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणावर तत्काळ व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर. गटनेता राजू तोडणकर, नगरसेवक नितीन जाधव, सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, संदीप (बाबू) सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी पालिकेत शिस्त, सुसंस्कृत राजकारण आणि लोकशाही मूल्यांचे पालन होणे आवश्यक असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर त्वरित चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande