नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत अमरावतीच्या ३३ विद्यार्थिनींची नावे चंद्राभोवती प्रदक्षिणा करणार
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) | जि.प.गर्ल्स हायस्कूल अमरावती या शाळेतील विद्यार्थिनीची नावं थेट चंद्राची प्रदक्षिणा करणार आहे. नासा ही अमेरिकेची अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था असून, तिच्या आर्टेमिस २ कार्यक्रमांतर्गत मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्
गर्ल्स हायस्कूलच्या विद्याथीनींची नावे थेट चंद्रावर नासाचा उपक्रम : अंतराळयानातून अमरावती विभागातील अधिकारी, विद्यार्थ्यांची प्रदक्षिणा


अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) | जि.प.गर्ल्स हायस्कूल अमरावती या शाळेतील विद्यार्थिनीची नावं थेट चंद्राची प्रदक्षिणा करणार आहे. नासा ही अमेरिकेची अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्था असून, तिच्या आर्टेमिस २ कार्यक्रमांतर्गत मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जगभरातील नागरिकांना 'आभासी प्रवासी' म्हणून सहभागी करून घेण्याची संधी देण्यात आली होती. गर्ल्स हायस्कूल मधील उपक्रमशील शिक्षक विरेंद्र ब्राम्हण यांच्या पुढाकाराने त्यांच्या वर्गातील ३३ विद्यार्थिनी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नावे चंद्राची सफर करणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश, विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी आता मोठे होऊन वैज्ञानिक, अभियंते किंवा अंतराळवीर बनण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल ही नेहमीच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखली जाते. शाळेच्या दर्शनी भागात अवकाश यानाचे प्रतिकृती तयार करण्यात आली असून या शाळेला भेट देणारे अनेकजण या प्रतिकृती समोर सेल्फी काढतात. सामान्य माणसाला प्रत्यक्ष अंतराळात जाता येत नसले तरी, त्यांचे नाव प्रतीकात्मक रूपाने चंद्रापर्यंत पोहोचवण्याची ही एक अनोखी संधी आहे. या मोहिमेद्वारे संपूर्ण मानवजातीला अंतराळ मोहिमेसोबत भावनिकदृष्ट्या जोडण्याचा नासाचा प्रयत्न आहे.

आकर्षक बोर्डिंग पास :जगभरातील लाखो सर्वसामान्य नागरिकांची नावे मायक्रोचिपच्या माध्यमातून 'आर्टेमिस २' मोहिमेतील 'ओरियन' या अंतराळ यानात सुरक्षितपणे ठेवली जाईल. उड्डाण दरम्यान ही सर्व नावे पृथ्वीवरून तब्बल ४ लाख किलोमीटरचा प्रवास करतील. यामध्ये प्रत्येकाच्या नावाने स्वतंत्र 'व्हर्च्युअल बोर्डिंग पास' तयार होणार असून ही पास एखाद्या खऱ्या विमान प्रवासाच्या तिकिटासारखे डिझाईन केलेले असतात. या बोर्डिंग पासवर नावासह उड्डाण कोठून होणार, प्रवास ठिकाण व प्रवास अंतर दाखविले आहे.

शिक्षण विभागाची सफर:अंतराळ विज्ञानाबद्दल जगभरात, विशेषतः विद्यार्थी आणि तरुण पिढीमध्ये उत्सुकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विज्ञानाच्या या ऐतिहासिक भरारीमध्ये आपणही एक 'आभासी प्रवासी' म्हणून सहभागी आहोत, ही भावना यातून निर्माण होते. गर्ल्स हायस्कूलचे विरेंद्र ब्राह्मण यांनी शिक्षण विभागातील उपसंचालक, शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नावाच्या बोर्डिंग पास काढून त्यांची नावे या मोहिमेत जोडले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तथा मुख्याध्यापक संदीप बोडखे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande