रत्नागिरी : संशयित हृदयरोग मुलांकरिता शनिवारी टू डी इको तपासणी
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील संशयित हृदयरोग मुलांकरिता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी टू डी इको तपासणी जिल्हा रुग्णालयात होणार आहे. त्यानुसार येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर होणार आह
रत्नागिरी : संशयित हृदयरोग मुलांकरिता शनिवारी टू डी इको तपासणी


रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील संशयित हृदयरोग मुलांकरिता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी टू डी इको तपासणी जिल्हा रुग्णालयात होणार आहे. त्यानुसार येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर होणार आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या सोनोग्राफ्री सेंटरमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत मुंबईतील ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉ. पूजा सिन्हा (कन्सल्टंट पेडिॲट्रिक कार्डिओलॉजिस्ट) 0 ते 18 वयोगटातील संशयित हृदयरोग मुलांच्या टू डी इको तपासणीकरिता उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीमधून पुढील उपचारांची गरज असणाऱ्या मुलांकरिता ग्रामीण व उपजिल्हा स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हृदयरोग संशयित दोषी आढळणाऱ्या मुलांकरिता जिल्हा रुग्णालय येथे 2 डी इको तपासणी शिबिराचे आयोजन वर्षातून 2 वेळा केले जात होते. यापुढे 2 डी इको तपासणीकरिता मुलांना व पालकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. जिल्हा रुग्णालयाच्या सोनोग्राफ्री सेंटरमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तपासणी शिबिर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande