छ. संभाजीनगर: महिनाभरात २१,७२४ विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई
छत्रपती संभाजीनगर, २४ फेब्रुवारी (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या तिकीट तपासणी मोहिम राबवली. एका महिन्यातील या मोहिमेत २१,७२४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली गेली आणि
छ. संभाजीनगर: महिनाभरात २१,७२४ विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर कारवाई


छत्रपती संभाजीनगर, २४ फेब्रुवारी (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत रेल्वे प्रवाशांच्या तिकीट तपासणी मोहिम राबवली. एका महिन्यातील या मोहिमेत २१,७२४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली गेली आणि तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

रेल्वे विभागाच्या वाणिज्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरात २१९ तिकीट तपासणी कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेअंतर्गत चार जानेवारी रोजी सर्वाधिक कारवाई झाली, ज्या दिवशी ९०९ प्रकरणे नोंदवून ५,४८,७३८ रुपये वसुली करण्यात आले.

तपासण्या आदिलाबाद-नांदेड, परभणी-परळी, छत्रपती संभाजीनगर-मनमाड तसेच विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर केल्या गेल्या. या मोहिमेत १२ फोर्ट्रेस तपासण्या, दोन मॅसीव्ह तपासण्या आणि एक स्पॉट तपासणी झाली. याशिवाय अचानक रात्रकालीन तपासण्या घेऊन प्रवाशांवर काटेकोर कारवाई करण्यात आली.

रेल्वे विभागाने प्रवाशांना विनातिकीट प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, सुरक्षित आणि नियमीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अशा तपासण्या नियमितपणे राबवल्या जातील, असे सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande