
डोंबिवली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।
खाजगी रुग्णालयातील एका डॉक्टरने सोमवारी रात्रीच्या वेळी ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि १० बिअर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाणे तपास करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील एका डाॅक्टरचे एका परिचारिकेबरोबर प्रेमसंबंध होते. यावरून डॉक्टर व त्याच्या पत्नीचा वाद होत होता. ती परिचारिका विवाहित असूनही ती डाॅक्टरांच्या मागे विवाहासाठी तगदा लावला होता. याच चिंतेत असलेल्या डॉक्टरने यातून सुटका मिळण्यासाठी ४५ झोपेच्या गोळ्या आणि १० बिअरच्या बाटल्या पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
-------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi