नांदेडच्या देळूबमध्ये जमावाचा घरावर हल्ला, ५९ जणांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।रस्त्यावर फळांचा कचरा टाकल्याच्या किरकोळ कारणावरून तसेच एक व्हिडिओ काढला म्हणून अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथे एकाचा तरुणांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. प्रकरण एवढ्यावर थांबले नसून, बेकायदा जमाव
नांदेडच्या देळूबमध्ये जमावाचा घरावर हल्ला, ५९ जणांविरोधात गुन्हा दाखल


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।रस्त्यावर फळांचा कचरा टाकल्याच्या किरकोळ कारणावरून तसेच एक व्हिडिओ काढला म्हणून अर्धापूर तालुक्यातील देळुब बु. येथे एकाचा तरुणांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. प्रकरण एवढ्यावर थांबले नसून, बेकायदा जमावाने दगडफेक करत घरात घुसून सामानाची नासधूस केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

अर्धापूर पोलिस ठाण्यात ५९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला . यातील १६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विष्णुकांत कराळे यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातील वातावरण शांत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande