
जळगाव , 24 फेब्रुवारी (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाबाबत मार्च 2025 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यानुसार त्यामध्ये 04 महसुल मंडळात (1. गारखेडा ता. जामनेर) (1. टाकरखेडा 2. नगाव बु. 3. पातोंडा ता. अमळनेर) येथे व जळगांव शहरातील जमा झालेला 01 आधार संच असे एकूण 05 आधार संच वितरणासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मान्यतेने पुनःश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यातील पात्र ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळwww.jalgaon.gov.inवरून अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसूल मंडळांची नावे व आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी. इच्छुक ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतhttps://forms.gle/yr9KBvKJgd92hBXv6या गुगल लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, अशी माहिती प्र. निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर