परभणी - जि. परिषद अंतर्गत काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित वरपुडकर यांची निवड
परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)जिल्हा परिषदेंतर्गत काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित वरपुडकर यांची निवड करण्यात आली. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, ज्येष्ठ नेत
जिल्हा परिषद अंतर्गत काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित वरपुडकर यांची निवड : काँग्रेसजणांतर्फे स्वागत


परभणी, 24 फेब्रुवारी (हिं.स.)जिल्हा परिषदेंतर्गत काँग्रेसच्या गटनेतेपदी अजित वरपुडकर यांची निवड करण्यात आली.

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे नेते अभिजित देशमुख, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेशदादा देशमुख, माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेंतर्गत गटनेतेपदाकरीता वरपुडकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली.

दरम्यान, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वरपुडकर यांना गटनेते पदा संदर्भातील नियुक्तीचे पत्र प्रदान केले. यावेळी सलमान शेख, आशिष हरकळ, दिगंबर खरवडे, सुहास पंडीत आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande