
अकोला, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। आयुक्त, महानगरपालिका यांनी अकोला महानगरपालिकेच्या सभापती, स्थायी समिती, सभापती, महिला व बालकल्याण समिती, व सभापती, प्रभाग समिती या पदासाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विनंती केली होती.
या अनुषंगाने मा.विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसर अकोला महानगरपालिकेच्या उक्त सर्व सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वा. पासून अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजीत करण्यात येत आहे. सदर सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून श्रीमती वर्षा मीना, जिल्हाधिकारी, अकोला यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. महानगरपालिका, अकोला येथील उक्त सर्व समिती सभापती पदांसाठी निवडणूकीचे कामकाज एकामागे-एक अनुक्रमाने नियमानुसार पार पडणार आहे.
यासाठी नामनिर्देश पत्र वाटप बुधवार दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सका.11 ते सायं.5 वाजेपर्यंत, तसेच नामनिर्देश पत्र गुरूवार दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सका.11 ते सायं.5 वाजेपर्यंत अकोला महानगरपालिकेच्या महानगरपालिका सचिव कार्यालय येथे स्विकारण्यात येणार आहे, कृपया संबंधीतांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे