अकोला - जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा
अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट असून, ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
Photo

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन- जलजीवन मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मिशनमधील उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक योजनेचा सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री. राठोड म्हणाले, योजनेत अकोला तालुक्यातील ८९, अकोटमधील १४५, तेल्हारा तालुक्यातील ९६, बाळापूर तालुक्यातील ६५, पातूर तालुक्यातील २८, मूर्तिजापूर तालुक्यातील ७१, बार्शीटाकळी तालुक्यातील २९ अशा एकूण ५२३ गावांचा समावेश आहे. चार जुन्या व ११ नव्या पाणीपुरवठा योजनांतील कामे पूर्ण होत आहेत. अनेक योजनांची कामे ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहेत. अंगणवाडी व शाळांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे

 rajesh pande