अकोल्याचे सुपुत्र संदीप सागळे गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी
अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. सागळे हे गुजरात कॅडरचे २००७ चे आयएएस अधिकारी असून, त
Photo


अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची गुजरात राज्याचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. सागळे हे गुजरात कॅडरचे २००७ चे आयएएस अधिकारी असून, त्यांनी अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

गुजरातमध्ये मतदार यादीची विशेष सघन सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, निवडणूक आयोगाने नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने २००७ च्या बॅचचे स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी संदीप सागळे यांची नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सागळे यांनी यापूर्वी अहमदाबादचे जिल्हाधिकारी, तसेच बनासकांठा आणि भरूच सारख्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सागळे यांनी काही काळ गांधीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. १६ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्मलेले संदीप सागळे हे मूळ महाराष्ट्रातील अकोला येथील आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande