
अकोला, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला येथील शास्त्री स्टेडियम येथे सुरू असलेल्या वऱ्हाड जत्रा मिनी सरस महोत्सव 2026 मध्ये हास्य कवी तथा अभिनेते किशोर बळी यांनी ' सारं गाव मामाचं ' हे एकपात्री वऱ्हाडी प्रयोग सादर करून श्रोत्यांना हसून हसून लोटपट केले. हा कार्यक्रम आज शास्त्री स्टेडियमवर पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अमरावती विभागीय कार्यालयाचे उपायुक्त विकास राजीव फडके, उमेद चे सहसंचालक दिगंबर लोखंडे, वित्त नी लेखा अधिकारी माया शिर्के, महिला व बालकल्याण च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे, अकोला जिल्हा न्यायाधीश रोहिणी बन्सल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाडवे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते. किशोर बळी यांनी त्यांच्या एकपात्री नाटकामध्ये पिंट्या च्या पात्राचे भोवती ग्रामीण भागातील अनेक किस्से, व्यक्तिमत्व विनोदी शैलीने श्रोत्यांसमोर सादर केले. श्रोत्यांनी या एकपात्री नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे