
अकोला, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। महापौर शारदा खेडकर यांच्याव्दारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार आज दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी मनपा पुर्व झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्दारे उमरी येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून फळ व भाजी विक्री करणा-या किरकोळ अतिक्रमण धारकांना मनपाची जुनी शाळा क्रं. 5 येथे तयार करण्यात आलेल्या हॉकर्स झोन येथे स्थलांतरीत करून रस्ता मोकळा करण्यात आला.
या कारवाईत सहा.आयुक्त राजेश सरप, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, राहूल राऊत तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे