अकोला - मोठी ऊमरी येथील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई
अकोला, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने तसेच मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि पुर्व झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात आज दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी मोठी ऊमरी येथील मुख्य रस्त्यावरील हॉलीडे बार
Photo


अकोला, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने तसेच मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि पुर्व झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनात आज दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी मोठी ऊमरी येथील मुख्य रस्त्यावरील हॉलीडे बार च्या बाजुला शामराव वाहुरवाघ यांच्याव्दारे मंजूर नकाशा व्यतिरिक्त करण्यात आलेल्या बांधकामावर तसेच मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या किरकोळ अतिक्रमणावर मनपा प्रशासनाव्दारा पोलीस प्रशसनाच्या सहकार्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडचण निर्माण करणारे अतिक्रमण संबंधीत अतिक्रमण धारकांनी स्वत: आपले काढून मनपा प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा मनपा प्रशासनाव्दारा संबंधीत अतिक्रमण काढण्यात येणार आहे. कृपया संबंधितांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे.

या कारवाईत सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, पोलीस कर्मचारी आशिष खंडारे, स्नेहल जोगळेकर, मंगेश चुनावाला, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, राहूल राऊत तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande