
अकोला, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मध्य भागातून वाहणारी मोर्णा नदीच्या पात्रात उन्हाळ्याचे दिवसांमध्ये जलकुंभी वाढण्यास सुरूवात होत असते. यामुळे शहरात डासांच्या प्रादुर्भावात वाढ होते आणि नदी काठच्या भागात वास्तव्य करणा-या नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन आरोग्यास सुध्दा धोका निर्माण होतो.
पाहणी दरम्यान असे आढळून आले की, मोर्णा नदीच्या काठावर जलकुंभी येण्यास सुरूवात झालेली आहे. सदर वाढत असलेली जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढण्या अगोदरच काढण्याची कारवाई सुरू करण्यात यावी असे निर्देश आज दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर शारदा खेडकर यांनी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांना दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे