
लातूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। लातूरच्या राजकारणातील एक अभ्यासू, संयमी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यावर पक्षाने आता राज्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे. अर्चना पाटील चाकूरकरांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात भाजपला एक नवी ऊर्जा आणि बळकटी मिळणार आहे.
नेतृत्वाची पावती: डॉ. ताईंचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने हा सन्मान केला आहे.
संघटन कौशल्य: त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत आणि व्यापक होईल, यात शंका नाही.
जनतेचा आवाज: सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द असलेल्या नेत्याला आता प्रदेश पातळीवर व्यासपीठ मिळाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis