नांदेड-अर्धापूर नगरपंचायतीने राबविले स्वच्छता अभियान
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)हाती झाडू, मुखी राष्ट्रसंतांचे नाव अशा उत्साही वातावरणात अर्धापूर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केवळ हार-फुले अर्पण करून औपचारिकता न पाळता, प्रत्यक्ष कृतीतून गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत नगरपंचायत प्रशास
नांदेड-अर्धापूर नगरपंचायतीने राबविले स्वच्छता अभियान


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)हाती झाडू, मुखी राष्ट्रसंतांचे नाव अशा उत्साही वातावरणात अर्धापूर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. केवळ हार-फुले अर्पण करून औपचारिकता न पाळता, प्रत्यक्ष कृतीतून गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत नगरपंचायत प्रशासनाने शहराचा कानाकोपरा चकाचक केला. या मोहिमेची सुरुवात शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरापासून झाली. 'स्वच्छता हीच सेवा' हा मंत्र जपत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले.

सार्वजनिक ठिकाणांवरील साचलेला कचरा, प्लास्टिक आणि अस्वच्छता दूर करून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात आला. स्वच्छतेचा निर्धार करण्यात आला. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ आदेश न देता मुख्याधिकारीजगदीश दळवी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुखांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केले. स्वच्छ अर्धापूर, सुंदर अर्धापूर 'हे आमचे कायमस्वरूपी ध्येय आहे. नागरिकांनी कचरा कुंडीतच टाकावा आणि शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, हीच गाडगेबाबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला. प्रमुख उपस्थिती या मोहिमेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. नगराध्यक्षा सौ. वैशाली प्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदरखान पठाण, मुख्याधिकारीः जगदीश दळवी, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, व्यंकटी राऊत, ऍड. योगेश माटे सर्व नगरसेवक व कर्मचारी. सहभाग होता. प्रशासकीय पथकाचा सक्रीयसहभाग घेत केवळ औपचारिकता न पाळता प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही हातात झाडू घेऊन श्रमदान केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande