
एआय समिटमध्ये केलेल्या अर्धनग्न आंदोलनाची निंदा
कोल्हापूर, २४ फेब्रुवारी (हिं.स.) राजधानी दिल्ली येथे आयोजित आंतराराष्ट्रीय एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी (भाजप) कोल्हापूर महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा धिक्कार असो, राहुल गांधीचे करायचे काय, देशद्रोही राहुल गांधी माफी मागा अशा घोषणांद्वारे चौक दणाणून सोडला.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, “भारतामध्ये आयोजित AI शिखर परिषदेला ८० हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले, पण काँग्रेसने गुंड प्रवृत्तीची लोक आणून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार देशद्रोहा सारखा आहे. AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची ओळख वाढत असताना काँग्रेसचे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. भाजप कोल्हापूरच्या वतीने काँग्रेसचा हा जाहीर निषेध केला जातो.”
यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, मेघाराणी जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात धनश्री तोडकर, संगीता खाडे, नगरसेवक विशाल शिराळे, बबन मोकाशी, पूर्वा राणे, अर्चना कोराणे, नीलिमा पाटील, रेखा उगवे, दीपा ठाणेकर, माधुरी व्हटकर, सुशीला पाटील, संगीता मोरे, अशोक लोहार, भूषण कानकेकर, जयेश घरपणकर, पंकज बारड, निरंजन घाटगे, शिवानी पाटील, सीमा पालकर, अनिता ढवळे, रीमा पालनकर, तेजश्विनी पार्टे, अलका जावीर, रुपाली आगळे, अश्विनी वास्कर, सुजाता पाटील, शारदा पोटे, विशाखा कलशेट्टी, वंदना बंबलवाड, धीरज पाटील, अमेय भालकर, विवेक राजवर्धन, आदित्य पाटील, विकास माने, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता.
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar