बीड : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। धोंडराई फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा अंत झाला. समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली, ज्यामुळे दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नामदेव राऊ
बीड : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। धोंडराई फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा अंत झाला. समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली, ज्यामुळे दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

नामदेव राऊत (वय ३६, रा. बेलगाव, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. राऊत उमापूर भागातील आपल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी गेले होते. पाहुण्यांची भेटघेऊन दुचाकीवरून पुन्हा आपल्या गावाकडे (बेलगाव) परतत असताना धोंडराई फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार, धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरून खाली पडले आणि त्याच वेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघात घडल्यानंतर संधी साधून ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला. मयत नामदेव राऊत यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. गेवराई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande