नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांची पाहणी
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।नायगाव तालुक्यातील सोमठाना येथील दिनानाथ मंगेशकर या शाळेत व बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय बरबडा येथील परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक भेट दिली नव्याने स्थापन झालेल्या सोमठाना ये
नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांची पाहणी


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।नायगाव तालुक्यातील सोमठाना येथील दिनानाथ मंगेशकर या शाळेत व बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय बरबडा येथील परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक भेट दिली नव्याने स्थापन झालेल्या सोमठाना येथील केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी धडक देत त्यांनी केंद्राजवळ भेटीसाठी आलेल्या संस्था चालक व मुख्याध्यापकांना समज दिली आहे .परीक्षा प्रक्रीयेत कोणतीही ढिलाई चालणार नाही असे स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

गणित विषयाच्या पेपरसाठी २८१७ विद्यार्थी उपस्थितीत होते तर४१ विद्यार्थी अनुपस्थित होते. नायगाव परिक्षक कार्यालय सीयू-२१८ अंतर्गत १२ वी विज्ञान शाखेचा गणित विषयाचा शांततेत पार पडला. या केंद्रावर एकूण २८५८ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी २८१७ विद्यार्थी उपस्थित राहिले, तर ४१ विद्यार्थी अनुपस्थित होते. केंद्र क्रमांक १४९ श्री साईबाबा विद्यालय, शंकर नगर येथे २३१ पैकी २२८ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३ जण गैरहजर होते. केंद्र क्रमांक २६० मा. दिनानाथ मंगेशकर विद्यालय, सोमठाणा येथे सर्व १०० विद्यार्थी उपस्थित राहिले. जनता विद्यालय, नायगाव (केंद्र २६१) येथे ३५१ पैकी ३४६ विद्यार्थी उपस्थित होते, तर ५ जण अनुपस्थित होते.यमुनाबाई कन्या विद्यालय, नायगाव (केंद्र २६२) येथे २६१ पैकी २६०, श्री दत्त विद्यालय, नायगाव (केंद्र २६३) येथे २७२ पैकी २६७, तसेच श्री संत ज्ञानेश्वर रा.मा.वि. धुपा (केंद्र २६४) येथे १४२ पैकी १४१ विद्यार्थी उपस्थित होते.

ओयोसिस इंग्लिश मीडियम

स्कूल, कुंटूर (केंद्र २६५) येथे १४१ पैकी १४०, जवाहरलाल नेहरू विद्यालय, बरबडा (केंद्र २६६) येथे ४०० पैकी ३९४, पो.बे.आ. कन्या विद्यालय, मरवाळी तांडा (केंद्र २६७) येथे ३६२ पैकी ३५६ विद्यार्थी उपस्थित राहिले.के. देविदास पवार विद्यालय, कुंटूर तांडा (केंद्र २६८) येथे १५५ पैकी १५०, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, नरसी (केंद्र २६९) येथे ३०४ पैकी २९९, तर जि.प. हायस्कूल, कुंटूर (केंद्र २७०) येथे १३९ पैकी १३६ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व केंद्रांवर पेपर शांततेत व सुरळीत परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसून प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande