डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। तामसा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलं. मुंबई येथे सभागृह यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पु
डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। तामसा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलं. मुंबई येथे सभागृह यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे कार्यरत डॉ. मोहिनी सूर्यवंशी वैधकीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे यांच्या नियंत्रणाखाली असलेले जिल्ह्यात अव्वल ठरलेले प्रा आ केंद्र तामसा मागील सलग तीन वर्ष प्रसूती जिल्ह्यात प्रथम कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सलग तीन वर्ष शत प्रतिशत उद्दिष्ट पूर्ण, सलग तीन वर्ष पुरुष शस्त्रक्रिया, क्षयरोग रुग्ण, कुष्ठरुग्ण, हत्तीपाय रुग्ण, इतर राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यात प्रथम ठरल्या राज्यस्तरीय पुरस्कारा साठी पात्र ठरले असून मान्यवरांचा हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला .

कुटुंब कल्याण पुरुष शस्त्रक्रिया सर्जन डॉ. साहेबराव भिसे, TL सर्जन डॉ दीपक कदम लेप्रोस्कॉपी सर्जन डॉ रमेश बोले, यांचे मोलाचे योगदान लाभले होते, तसेच प्रसूतीसाठी वर्षा कन्हाळे, आदी परिचारिका विष्णू ढोले, मीनाक्षी राठोड यांचे खुप मोठे योगदान लाभले,

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande