रत्नागिरी : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 27 फेब्रुवारीला
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे येत्या २७ फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या
रत्नागिरी : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 27 फेब्रुवारीला


रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे येत्या २७ फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॕण्ड टेक्नॉलॉजी, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी येथे हा मेळावा होईल.

जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना/उद्योजकांनी उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावी व जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/ उद्योजकांनी युझर आयडी व पासवर्ड चा वापर करून रिक्त पदे ऑनलाइन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र) मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande