कान्नापूर येथे २८ फेब्रुवारीपासून शेतकरी कीर्तन महोत्सव
बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।धारूर तालुक्यातील कान्नापूरयेथे येत्या २८ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील चार वर्षांपासून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्
कान्नापूर येथे २८ फेब्रुवारीपासून शेतकरी कीर्तन महोत्सव


बीड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।धारूर तालुक्यातील कान्नापूरयेथे येत्या २८ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील चार वर्षांपासून शेतकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे

जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवानिमित्त कान्नापूर येथे २५ गावांनी एकत्रित येऊन या महोत्सवाचे आयोजन केले आहे. उद्घाटन प्रसंगी भारत महाराज जाधव, उद्धव बापू आपेगावकर आदी उपस्थित राहणार असून महोत्सवात मधुकर महाराज बारूळकर, अविनाश महाराज भारती, जनक महाराज सोळंके, गणपत महाराज पवार, एकनाथ महाराज माने, ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांची कीर्तने होणार असून समारोप शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.पारंपरिक कीर्तनासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य, पर्यावरणाचा शेतीवर होणारा परिणाम, तसेच शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती यावर प्रबोधन केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधत प्रबोधन करणारा हा महोत्सव परळी तालुक्याच्या वैचारिक परंपरेचा महत्त्वाचा भाग बनला आहे. दररोज एका गावातून भाकरी गोळा केल्या जाणार असून कीर्तन मंडपात साध्या पद्धतीने भोजनाची व्यवस्था केली जाते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande