नांदेड : श्री किशन महाराज गुरु स्वामी यांच्या ५१ दिवसीय साधनेची भव्य सांगता
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वर्ष २०२५ मध्ये ३२५ दिवस अन्नत्यागाचा संकल्प करून उपास सुरू करणारे श्री किशन महाराज गुरु स्वामी यांनी आपल्या कठोर तपश्चर्येची सांगता पुस नदीच्या तीरावर, औदुंबर वृक्षाच्या पवित्र सान्निध्य
अ


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वर्ष २०२५ मध्ये ३२५ दिवस अन्नत्यागाचा संकल्प करून उपास सुरू करणारे श्री किशन महाराज गुरु स्वामी यांनी आपल्या कठोर तपश्चर्येची सांगता पुस नदीच्या तीरावर, औदुंबर वृक्षाच्या पवित्र सान्निध्यात ५१ दिवसांच्या अखंड साधनेनंतर भव्य महायज्ञाने केली. पुसनदीच्या तीरावर प्रकाश पाटील यांच्या शेतात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात १११ जोडप्यांच्या - हस्ते महायज्ञ विधिवत संपन्न झाला.

५१ दिवस अखंड धार्मिक साधना, संपूर्ण ५१ दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले. यामध्ये रुद्राभिषेक, औदुंबर वृक्ष प्रदक्षिणा, नामस्मरण, हनुमान चालीसा पठण, दैनंदिन यज्ञ-हवन, गंगा पूजन व गंगा आरती अशा कार्यक्रमांचा समावेश होता. शेकडो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत वातावरण सतत भक्तिमय व आध्यात्मिक उर्जेने भारलेले होते. सर्व पूजा निशुल्क देणगी-दक्षिणा स्वीकारली नाही, या संपूर्ण उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यज्ञ व पूजेमध्ये सहभागी झालेल्या एकाही यजमानाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क, दक्षिणा किंवा पूजेच्या साहित्याचे पैसे स्वीकारण्यात आले नाहीत.

करंजखेड येथील हनुमान भक्त समितीने महिला, पुरुष, युवक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या सहकार्याने अहोरात्र परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला. अनेकांनी स्वतःला पूर्णतः या कार्यासाठी वाहून घेतले. कुणालाही व्यक्तिगत प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती; सर्वांनी सेवा हनुमंत रायाच्या चरणी समर्पित केली. कार्यक्रमाच्या समारोपावेळी किशन महाराज गुरु स्वामी यांनी कोणाचेही आभार किंवा धन्यवाद व्यक्त न करता, ही सर्व सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही, असे सांगितले. दानशूर व सेवाभावी भक्तांना पुढेही असेच सत्कर्म करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी हनुमंत राय व दत्तप्रभूच्या चरणी केली. संपूर्ण परिसरात जय श्रीराम, जय हनुमानच्या जयघोषात या महायज्ञाची सांगता झाली आणि भक्तिमय वातावरणात एक ऐतिहासिक धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande