पुणे - 'हिंद-दि चादर' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीचे व्यवस्थापन
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।''हिंद-दि चादर'' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था आली असून भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्
collector dudi


पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।'हिंद-दि चादर' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था आली असून भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

शीख धर्माचे ९ में गुरू श्री गुरु तेग बहादुर साहिबनी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्ता साहिबचा गौरवशाली इतिहास नागरिकांना माहिती होण्यासोबतच त्यांचे बलिदान स्मरण राहण्याकरिता २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई येथे हिंद-दि चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे; या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त, पुणे विभाग व जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आढावा बैठका घेतल्या आहेत.

या बैठकांमध्ये जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबनी यांच्या जीवनावर आधारित निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य पंधरवडा राबविण्यासोबतच विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील मल्टिप्लेक्स व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये हिंद-दि-चादर या गाण्याची चित्रफीत दाखविणे.

पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्यामार्फत जिल्ह्यातून किती जनसमुदाय कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे याची माहिती, वाहनांची ट्रॅकिंग करणे आदी अनुषंगीक माहिती पनवेल येथील पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागास उपलब्ध करुन देणे. राष्ट्रीय महामार्ग पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत महामार्गावरून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande