अमरावती- विश्रामस्थळी खून प्रकरणी राजकोटच्या दोन आरोपींना अटक
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) ।अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाणे हद्दीतील एनएच–५३ वरील IRB ट्रक विश्रामस्थळी झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून राजकोट (गुजरात) येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विश्रामस्थळी २० फ
IRB विश्रामस्थळी खून प्रकरणाचा छडा राजकोटचे दोन आरोपी कारसह अटकेत


अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.) ।अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाणे हद्दीतील एनएच–५३ वरील IRB ट्रक विश्रामस्थळी झालेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून राजकोट (गुजरात) येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विश्रामस्थळी २० फेब्रुवारी रोजी पहाटे चौकीदार जानराव ठाकरे यांना विमल सतीशभाई आग्रावत (२२, रा. राजकोट) हा रक्ताच्या थारोळ्यात आढळला. घटनास्थळी धारदार चाकू सापडल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलीस पथक राजकोट येथे रवाना झाले. गुप्त माहितीच्या आधारे माहिर माजीदभाई सोलंकी (२२) व राज वहिदभाई चव्हाण (२२) यांना GJ03PD0911 क्रमांकाच्या बलेनो कारसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत पॉक्सो प्रकरणातील वाद, पैशांची मागणी व जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे सूडातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलीसांनी संयुक्तरीत्या पार पाडली. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande