विरार पूर्व येथे संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन
पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन विरार पूर्व येथील कारगिल नगर, मनवेल पाडा रोडवरील वेदांगी अपार्टमेंटमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. हा समारंभ संघटनेच्या राज्याध्यक्षा सुमनताई मानकर यांच्या अध्यक्षतेख
संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे विरार पूर्व येथे उद्घाटन


पालघर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे उद्घाटन विरार पूर्व येथील कारगिल नगर, मनवेल पाडा रोडवरील वेदांगी अपार्टमेंटमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. हा समारंभ संघटनेच्या राज्याध्यक्षा सुमनताई मानकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

उद्घाटनप्रसंगी संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. यावेळी साठये महाविद्यालयाचे प्राध्यापक गौतम मस्के, रमेश वावळे, तालुका अध्यक्ष भरत माळी, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत गायकवाड व विजय पाटील, तालुका महिला सचिव सारिका गायकवाड, तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भोईर उपस्थित होते.

ज्या नेतृत्वाखाली हे कार्यालय सुरू करण्यात आले त्या योगेश गोसावी आणि संदेश गोसावी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाला स्थानिक नगरसेविका प्रतिभा पाटील आणि नगरसेवक नारायण मांजरेकर यांचीही विशेष उपस्थिती होती.संघर्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या कार्यालयामुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande