
सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी, व सुशिक्षित बेरोजगार यांनी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे 5 दिवसाचे कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित केले आहे असून दि. 09 मार्च 2026 ते 13 मार्च 2026 पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छीत असलेल्यांनी दि. 24 फेब्रुवारी 2026 ते 06 मार्च 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तरी याचा लाभ घ्यावा. सदर प्रशिक्षानार्थ्याची शैक्षणिक पात्रता किमान इ.7 वी पास असणे अपेक्षित आहे. तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे.
सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 200/- रुपये आकारण्यात येईल. सोबत शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, गुणपत्रक व पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे. असे आवाहन डॉ. ए. एस. तांबे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सोलापूर यांनी केले आहे. तर सदर प्रशिक्षणासाठी संपर्क डॉ. स्नेहंका बोधनकर, पशुधन विकास अधिकारी गट-अ, सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, बी.पी.एड. कॉलेजजवळ, सोलापूर येथे साधावा असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा परिषद, सोलापूर यांनी केले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड