नांदेड : ग्रंथालय संघाचे १ मार्चला नायगावला अधिवेशन
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी ग्रंथालय संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन येत्या दि. १ मार्च रोजी नायगाव येथे आयोजित केल्याची माहिती खा. रवींद्र चव्हाण यांनी दिली. अधिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शि
नांदेड : ग्रंथालय संघाचे १ मार्चला नायगावला अधिवेशन


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी ग्रंथालय संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन येत्या दि. १ मार्च रोजी नायगाव येथे आयोजित केल्याची माहिती खा. रवींद्र चव्हाण यांनी दिली.

अधिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम राहणार आहेत. खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ग्रंथालय संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन कोटेवार (मुंबई), श्रीमती नंदाबाई गंगाधर पटने, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, राजेंद्र हंबीरे, केशवराव चव्हाण, माधवराव बेळगे, विजय पाटील चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, प्रा बाबासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या अधिवेशनात तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध सार्वजनिक व वाचनालय प्रतिनिधी, ग्रंथपाल, साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. वाचन संस्कृतीचा प्रसार, ग्रामीण भागातीलग्रंथालयांचे सक्षमीकरण, शासनाच्या विविध योजना आणि डिजिटल ग्रंथालय संकल्पना या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. ग्रंथालये ही समाजाच्या वैचारिक प्रगतीची केंद्रे असून, युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा अधिवेशनांची गरज असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले. अनेक ग्रंथालये बंद अवस्थेत आहेत. तसेच अधिकचे मानधन मिळत नसून नायगाव तालुक्यातील ६३ पैकी ३९ ग्रंथालय सुरु असून जिल्ह्यात हीच परिस्थिती निर्माण झाल्याने या अधिवेशनात ग्रंथालयच्या प्रमुख मागण्या निकालीत काढणार असून माझे वडील कै. खा. वसंतराव चव्हाण यांनी सांगितले होते की, ग्रंथालयचे पुढील अधिवेशन नायगावात घ्यायचे आहे. त्यामुळे या वर्षीचे अधिवेशन नायगाव येथील जनता हायस्कूलच्या मैदानावर होणार असून स्वर्गीय ग्रंथ महर्षी माजी आ. गंगाधर पटणे यांना आदराजंली अर्पण करून त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दि. १ मार्च रोजी सकाळच्या सत्रात नायगाव येथील हनुमान मंदिरापासून जनता हायस्कूलपर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande