छ. संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर यांची निवड
छत्रपती संभाजीनगर, २४ फेब्रुवारी (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे नियुक्तीपत्र महापौर समीर राजूरकर यांनी हस्तांतरित केले. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी ख
अ


छत्रपती संभाजीनगर, २४ फेब्रुवारी (हिं.स.) । छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे नियुक्तीपत्र महापौर समीर राजूरकर यांनी हस्तांतरित केले.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालिकेत येऊन अब्दुल समीर यांचे अभिनंदन केले. महापालिकेत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आले असून, एमआयएमचे ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी एमआयएमचाच होणार असल्याचे स्पष्ट झाले.

एमआयएमच्या नगरसेवकांची बैठक गेल्या आठवड्यात जलील यांच्या उपस्थितीत झाली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर यांचे नाव घोषित करण्यात आले आणि त्यानंतर एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौर समीर राजूरकर यांना त्यांचे पत्र सुपूर्द केले. या कार्यक्रमात हाजी शेरखान आणि इतर महत्त्वाचे नगरसेवक उपस्थित होते.

महापौर समीर राजूरकर यांनी या प्रसंगी विरोधी पक्षनेत्यांना शहराच्या विकासात योगदान देण्याचे आणि पालिकेच्या सभागृहाचे कार्य व्यवस्थित चालविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande